इतर मागासवर्ग कल्याण समितीवर आ.वड्डेटीवार व आ.काशीवार

0
16

मुंबई,दि,10- महाराष्ट्र विधानमंडळाच्या विधीमंडळ स्तरावरील इतर मागासवर्ग कल्याण (ओबीसी) समितीच्या प्रमुखपदी आमदार डॉ. संजय कुटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.तसेच या समितीत आमदार डॉ. पंकज भोयर, श्रीमती देवयानी फरांदे, राजेश काशिवार, अतुल सावे, ज्ञानराज चौगुले, नागेश पाटील-अष्टीकर, विजय वडेट्टीवार, धैर्यशील पाटील, सुभाष ऊर्फ पंडीतशेठ पाटील, क्षितीज ठाकूर, श्रीमती स्मिता वाघ, रामराव वडकुते, ॲड. जयदेव गायकवाड, श्रीमती दीप्ती चवधरी हे या समितीचे सदस्य आहेत. समितीमध्ये विदर्भातील अभ्यासू आणि ओबीसी प्रश्नांची जाण असणारे ब्रम्हपुरीचे आमदार विजय वड्डेटीवार आणि साकोलीचे आमदार राजेश (बाळा) काशीवार यांचा समावेश करण्यात आला आहे.यांच्या समावेशाने ओबीसी संघटनांना ओबीसींचे काही प्रश्न निकाली काढण्यास मदत होणार असल्याचे वाटत आहे.