मनमाडजवळ अपघातात आठ जणांचा मृत्यू

0
8

मनमाड, दि.१० – मनमाड – मालेगाव महामार्गावर मंगळवारी मध्यरात्री टेम्पो, कार व ट्रकमध्ये झालेल्या विचित्र अपघातात ८ जणांचा दुर्दैवी अंत झाला. या अपघातात ९ जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
चोंढी घाटाजवळ कुंदलगाव येथे मंगळवारी मध्यरात्री विचित्र अपघात झाला. मालेगावकडे जाणा-या ट्रकला समोरुन येणा-या टेम्पोने धडक दिली. याच दरम्यान ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असलेली मारुती व्हॅन ट्रक व टेम्पोत सापडली. मारुती कारमधून मालेगावमधील अजमेर दर्ग्यावरुन तांबोळी कुटुंब परतत होते.