जिल्हा मध्यवर्ती बँकांनी शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्यासाठी सकारात्मक धोरण ठेवावे – मुख्यमंत्री

0
19

मुंबई दि.१० : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, नाबार्ड या वित्तीय संस्थांनी शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्यासाठी सकारात्मक भूमिका घ्यावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची आढावा बैठक बुधवारी वर्षा निवासस्थानी आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.या बैठकीस सहकार मंत्री चंद्रकांत पाटील, सहकार राज्यमंत्री दादा भुसे, सहकार विभागाचे प्रधान सचिव शैलेश शर्मा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव आदी वरिष्ठ अधिकारी तसेच नाबार्ड बँकेच्या महाराष्ट्र क्षेत्राचे मुख्य जनरल मॅनेजर डॉ. यु.एस.सहा उपस्थित होते.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, शेतकरी हा महत्त्वाचा घटक असून शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी बँकांनी आवश्यक तेथे लवचिकता ठेवून सकारात्मक भूमिका घ्यावी. ज्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडे अपुरा निधी असेल त्यांना नाबार्ड बँकेने कर्ज पुरवठा उपलब्ध करावा. बँका चांगल्या चालण्यासाठी बँकानी चांगला कार्यभार करावा. तसेच गैरकारभार झालेल्या ठिकाणी कडक कारवाई करावी, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.