सोलापूरात शिष्यवृत्तीची 1 कोटीची रक्कम हडपली

0
10

सोलापूर दि. १४ –: मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र समाजकल्याण विभाग संबधीत शाळा,महाविद्यालयांशी संधान साधून शिष्यवृत्तीची रक्कम हडपत असल्याचा प्रकार गडचिरोली येथे उघडकीस पहिल्यांदा आली.त्यानंतर वर्धा,चंद्रपूर अशाप्रकारे हा लोण आता सोलापूरात येऊन पोचला आहे.सोलापूरात तर चक्क समाजकल्याण विभागातील कर्मचाऱ्यांनीच त्यावरच डल्ला मारल्याचे समोर आले असून प्रथमदर्शनी १ कोटी १५ लाखांचा घोटाळा उघड झाल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी सामाजिक न्याय राज्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.विविध जिल्ह्यातील या शिष्यवृत्ती घोटाळ्याची चौकशी सुरु आहे,परंतु सरकार यात सुत्रधार सोधून काढण्यात अपयशी ठरले आहे.
राज्याच्या समाजकल्याण कार्यालयाकडून मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीचं वाटप करण्यात येतं. राज्यभरात ऑनलाईन पद्धतीनं शिष्यवृत्तीच्या रकमेचं वाटप सुरू आहे. पुण्याच्या मास्केट कंपनीकडे कंत्राटी पद्धतीनं हे काम देण्यात आले आहे. मात्र कंपनीच्या सारिका काळे, स्मिता साळुंखे, सोनाली पांडे नावाच्या कर्मचाऱ्यांनी अपहार केल्याचं उघड झाले आहे.समाजकल्याण विभागाकडून मात्र कुठलीही कारवाई होत नव्हती. मात्र विद्यार्थ्यांनी हा सारा धक्कादायक प्रकार उघडकीस आणल्यानंतर विभागाने संबंधित कंपनीसह ३१ जणांवर गुन्हा दाखल केले.