मी बीए पास नाही! पाणीपुरवठा मंत्री लोणीकरांची कबुली

0
14

जालना,दि.दि. १४ –आतापर्यंत प्रतिज्ञापत्रामध्ये कोणतीही चुकीची माहिती दिली नाही असा दावा करणाऱ्या पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी प्रथमच आपण बीए नसल्याचं मान्य केले आहे.आज रविवारी जालन्यामध्ये आले असता एका वृत्तवाहिनीशी बोलताना याचा खुलासा केला.यामुऴे त्यांची बाजू घेणारे मुख्यमंत्री सुध्दा तोंडघशी पडल्याचे राजकीय चर्चा आहे.
लोणीकर यांनी 2009च्या प्रतिज्ञापत्रामध्ये आपण बीए प्रथमवर्षाला असल्याचा दावा केला होता. पण प्रत्यक्षात लोणीकर यांनी मुक्त विद्यापीठामध्ये बीएला प्रवेश घेण्यासाठीची पात्रता परीक्षा दिली होती. त्यामुळे लोणीकर आता अडचणीत येण्याची शक्यता आहे.निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात चुकीची किंवा खोटी माहिती देणं हा गुन्हा असून, तो सिद्ध झाल्यास मंत्रिपदासह आमदारकीही रद्द होण्याची शक्यता असते. त्यामुळे आता काँग्रेसनं दाखल केलेल्या तक्रारीनंतर लोणीकर यांच्यावर भाजप पक्ष आणि निवडणूक आयोग काय कारवाई करणार हेच बघायचे आहे.हा वाद ताजा असतानाच काल लोणीकरांनी कौटुंबिक माहितीही दडवल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावतांनी केला. लोणीकरांना दोन पत्नी असताना प्रत्रिज्ञापत्रात त्यांनी एकच पत्नी असल्याचं नमूद केलं. त्यामुळे कौटुंबिक माहिती लपवल्यामुळेही लोणीकर यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे.असं असलं तरी आपल्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ केल्यानं काँग्रेस नेत्यांवर आपण अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार असल्याची माहिती लोणीकर यांनी दिली.