माहिती आयुक्त दीपक देशपांडेंच्या घराची झाडाझडती

0
23

औरंगाबाद, दि. १४ – महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रविवारी आजी – माजी सनदी अधिका-यांच्या घरांची झाडाझडती घेतली आहे.राज्याचे माहिती आयुक्त व तत्कालीन स्वीय सहाय्यक दीपक देशपांडे, बांधकाम विभागाचे माजी सचिव देवदत्त मराठे यांच्या घरांवर एसीबीने छापा टाकत महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहे.

महाराष्ट्र सदनातील कंत्राटातील भ्रष्टाचाराप्रकरणी एसीबीने छगन भुजबळ व अन्य १७ जणांवर काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल केला होता. एसीबीने याप्रकरणी आता बांधकाम विभागातील तत्कालीन अधिका-यांची झाडाझडती घ्यायला सुरुवात केली आहे. यानुसार रविवारी देवदत्त मराठे व दीपक देशपांडे यांच्या घराची झडती घेण्यात आली. देशपांडे यांच्या घरातून १ कोटींची ठेवी, ८० तोळे सोने व अन्य महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. या अधिका-यांची बँक खातीही सील केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.