वक्‍फ बोर्डाच्या जमिनीवर राज्य शासनाचेही अतिक्रमण

0
10

 

नागपूर दि, १४ – – राज्यात वक्‍फ बोर्डाची 92 हजार 766 एकर जमीन आहे. परंतु, यापैकी 45 हजार एकर जमिनीवर राज्य शासनासह विविध संस्था, राजकीय नेत्यांनी अतिक्रमण केले आहे. परंतु, या जमिनीचे अतिक्रमण काढण्याच्या कारवाईसाठी राज्य वक्‍फ बोर्डाचे गठण होणे आवश्‍यक आहे. परंतु, राज्य शासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप एआयएमआयएमने केला आहे.
मुस्लिमांच्या मोर्चाच्या तयारीसाठी महाराष्ट्र प्रदेश एमआयएमचे अध्यक्ष सय्यद मोईन तसेच डॉ. अब्दुल गफ्फार कादरी नागपुरात आले आहे. ते रविभवनात पत्रकारांसोबत बोलत होते. या वेळी त्यांनी एमआयएम केवळ मुस्लिमांचाच पक्ष नव्हे तर मराठा, दलित सर्वांचाच पक्ष असून विविध पदाधिकारी तसेच औरंगाबाद महापालिकेतील नगरसेवकही गैरमुस्लिम असल्याचे सांगितले. गोमांसावर बंदीबाबत विचारले असता सय्यद मोईन यांनी सरकारकडे विकासाच्या योजना नसल्याने नागरिकांचे विकासाच्या मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्याकरिता गोमांस बंदी लावण्यात आल्याचा आरोप केला.