विज्ञान भारतीची आयएफा परिषद उद्यापासून

0
18

नागपूर – लहान उद्योगांकडे संशोधनासाठी निधीचा अभाव असतो, त्या उद्योजकांना नवीन संशोधनाची माहिती व्हावी, या उद्देशाने विज्ञान भारती प्रदेश मंडळ, विदर्भ मंडळ आणि व्हीआयएतर्फे आयएफा परिषदेचे आयोजन व्हीएनआयटीत पाच ते सात फेब्रुवारीदरम्यान केले आहे. परिषदेचे उद्‌घाटन पाच फेब्रुवारी रोजी सकाळी दहाला अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते होईल. यावेळी खासदार अजय संचेती, निधी आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. सारस्वत, एमगिरीचे माजी संचालक डॉ. टी. करुणाकरण उपस्थित राहणार आहे, अशी माहिती परिषदेचे संयोजक व इस्रोचे माजी संशोधक मिथिलेश तिवारी आणि डीआरडीओचे माजी संशोधक डॉ. भारतभूषण जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.