रेल्वे 25, तर केंद्रीय अर्थसंकल्प 29 फेब्रुवारीला

0
7
नवी दिल्ली – संसदेत येत्या 25 फेब्रुवारीला (गुरुवार) रेल्वे अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. तर, केंद्रीय अर्थसंकल्प 29 फेब्रुवारीला सादर करण्यात येणार आहे.
त्यापुर्वी 23 फेब्रुवारीला संसदेत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी दोन्ही सभागृहांना संबोधित करणार आहेत. रेल्वे अर्थसंकल्पानंतर चार दिवसांनी म्हणजेच 29 फेब्रुवारीला आर्थिक पाहणी अहवाल व केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. संसदेत अर्थसंकल्पाचे पहिले सत्र 23 फेब्रुवारी ते 16 मार्चदरम्यान पार पडणार आहे. दुसरे सत्र 25 एप्रिल ते 13 मे दरम्यान आयोजित करण्यात आले आहे.