खनिज तेलाचे भाव तीन वर्षे पडलेले राहतिल – मुकेश अंबानी

0
15

वृत्तसंस्था

नवी दिल्ली, दि. 22 – खनिज तेलाच्या किमती जागतिक बाजारात किमान तीन वर्षे घसरलेल्या राहतिल असा अंदाज मुकेश अंबानी यांनी वर्तवला आहे. अंबानी हे जगातला सगळ्यात मोठा तेलशुद्धीकरण प्रकल्प असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आहेत. बराच काळ तेलाच्या किमती घसरलेल्या आहेत, आणि अशी स्थिती जगानं प्रथमच अनुभवली असल्याचं अंबानी यांनी सीएनएनच्या रफिक झकेरिया यांना दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.
याआधीही अनेकवेळा तेलाच्या किमतीत चढउतार झाले आहेत, परंतु केवळ पुरवठा वाढला म्हणून महिनोनमहिने तेलाचे भाव घसरले असं कधी झालं नाही असं अंबानी म्हणाले. अमेरिकेमध्ये या क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान उदयाला आलं आणि प्रचंड प्रमाणात तेलउत्पादन झाल्यामुळेही ही परिस्थिती आल्याचं त्यांनी सांगितलं.