विजय मल्ल्यांच्या किंगफिशर हाऊसचा लिलाव

0
7

मुंबई- देशातील १७ बँकांचे सुमारे नऊ हजार कोटींचे कर्ज बुडवणा-या विजय मल्ल्या यांना स्टेट बँक ऑफ इंडियाने चांगला दणका दिला आहे. कर्ज वसुलीसाठी स्टेट बँक विजय मल्ल्यांचा अंधेरीतील किंगफिशर हाऊसचा ऑनलाइन लिलाव करणार आहे.

किंगफिशर एअरलाईन्ससाठी स्टेट बँकेने हजारो कोटींचे कर्ज दिले होते. २०१३ पासून किंगफिशर एअरलाईन्सचे संचालन बंद असून, कंपनीवर सहा हजार कोटी रुपयांपेक्षा कर्ज आहे. स्टेट बँक आणि युनायटेड बँकेने मल्ल्या यांना थकबाकीदार म्हणून घोषित केले आहे.