हरियाणामध्‍ये पुन्‍हा तणाव

0
7
वृत्तसंस्था
पानीपत – हरियाणामध्‍ये आरक्षणाच्‍या मागणीसाठी जाट समाजाचे आंदोलन तीन आठवड्यानंतर पुन्‍हा एकदा पेटण्‍याची शक्‍यता आहे. जाट समाजबांधवांनी प्रलंबित मागण्‍यांसाठी शासनाला 72 तासांचा अल्टिमेटम दिला होता. गुरूवारी 72 तास संपल्‍यानंतर मंत्री अनिल विज म्‍हणाले की, जाट आरक्षणासाठी आम्‍ही नक्‍कीच बिल पास करू, मात्र सरकारला धमक्‍या देणे बंद करा.हरियाणाचे अतिरिक्त मुख्य सचिव(गृह) पी.के.दास म्‍हणाले की, जाट आंदोलक काही ठिकाणी एकत्र येऊ शकतात, अशी माहिती आम्‍हाला मिळालेली आहे.