पुण्यातील प्रॉपर्टीची नागपुरातून खरेदी

0
8

नागपूर : फॉच्यरुन रिअल इस्टेटने गोदरेज प्रॉपर्टीजसह केशवनगर पुणे येथे गोदरेज इन्फिनिटी नावाने निवासी टाऊनशिप योजना दाखल केली आहे. या योजनेत नागपुरातील लोकांना दोन आणि तीन बीएचके वातानुकूलित फ्लॅट किफायत दरात खरेदीची संधी आहे.
फ्लॅट खरेदीसाठी रामदासपेठेतील हॉटेल तुली इम्पिरिअरमध्ये विशेष ऑफर सकाळी १0 ते रात्री ८ या वेळात सुरू असून २२ मे अखेरचा दिवस आहे. ग्राहकांनी या संधीचा फायदा घेण्याचे आवाहन कंपनीने केले आहे. पुणे येथे निवासाला असलेल्या नागपुरातील युवा व्यावसायिकांना योजनेत गुंतवणुकीची संधी आहे. ही निवासी योजना ४३ एकरमध्ये असून सर्वाधिक हिरवागार परिसर आणि वाहतुकीच्या दृष्टीने उपयुक्त व आरामदायक सुविधा आहेत.
यामध्ये डीन गिलक्रिस्ट यांची स्पोर्टप्रो अकादमी, चार फाऊंटेन, स्पा आणि क्लब कॉन्सियर्स, होम ऑटोमेशन, इटालियन मार्बल फ्लोअरिंग, एअर कंडिशनर्स आदींचा समावेश आहे. या योजनेत खरेदीदाराला निश्‍चितच आनंद मिळेल, असा कंपनीचा दावा आहे. ही योजना पुणे रेल्वेस्थानकापासून ८.५ कि.मी. अणि विमानतळापासून १0 कि.मी. अंतरावर आहे.
पहिल्या टप्प्याच्या बांधकामात ५00 पेक्षा जास्त कुटुंबीय निवासाला आहेत. बांधकाम वेगात सुरू असून सर्व प्रकल्पाला संबंधित मान्यता आहेत. पुणे येथील सर्व मुख्य ठिकाणे प्रकल्पाजवळच आहेत