31 मार्चपासून जिओचा फ्री डेटा होणार बंद

0
14

मुंबई, दि. 21 – गेल्या काही दिवसांपासून रिलायन्स जिओची सेवा ग्राहकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. 4जी स्पीडसह अनलिमिटेड इंटरनेट जिओनं मोफत पुरवल्यामुळे ग्राहकांच्या जिओवर अक्षरशः उड्या पडल्या होत्या. मात्र जिओची फ्री डेटा सर्व्हिस 31 मार्चपासून बंद होणार आहे, अशी घोषणा रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी केली आहे. जिओ वापरकर्त्यांनी 100 कोटी जीबीहून जास्त डेटा वापरला आहे. त्यामुळेच जगातील मोबाईल डेटा वापरात जिओ नंबर 1 ठरली आहे. वर्षभरात जिओ देशातील प्रत्येक गाव, खेड्यात पोहोचली आहे. जिओला दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल मुकेश अंबानींनी ग्राहकांचे आभार मानले आहेत.
देशभरात 31 मार्चपासून जिओला रोमिंग फ्री असले तरी डेटासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. मात्र जिओचा डेटा इतर डेटा कंपन्यांच्या तुलनेत 20 टक्के स्वस्त असणार आहे. 31 मार्चनंतर जिओचा 303 रुपये प्रतिमहिना अनलिमिटेड डेटा मिळणार आहे. रिलायन्स जिओनं गेल्या सहा महिन्यांत 100 दशलक्ष वापरकर्त्यांचा टप्पाही ओलांडला आहे