समाधान करायला गेलेल्या नागरिकांच्या पदरी मात्र असमाधानच मिळाले

0
11

शिबिराच्या मंचावर भाजप नेत्यांची मांदियाळी,जि.प.सदस्य पालीवाल जनतेतच बसले
अर्जुनी मोरगाव,berartimes.com दि.२१-अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या समस्या निकाली काढण्यासाठी पालकमंत्र्यांनी समाधान शिबिराचे आयोजन गेल्या काही महिन्यापासून सुरु केले होते.यापुर्वी दोनदा या शिबिरातून आढावा घेण्यात आला.त्यातून ६५ हजार नागरिकांना विविध सोयी देण्यासाठी महासमाधान शिबिर मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत घेण्याची घोषणाही केली होती.परंतु पालकमंत्र्याच्या त्या घोषणेला मुख्यमंत्र्यानी दादच दिली नाही.त्यातच केंद्रसरकारच्या योजना गावापर्यंत पोचून लाभ मिळते की नाही यासाठी खासदारानी जनता दरबाराच्या आयोजनाला गोंदियापासून सुरवात केली.जनता दरबाराचे आयोजन होताच पालकमंत्र्यांना मात्र आपल्या समाधान शिबिराची पोलखोल होण्याची भिती होताच त्यांनीही तडकाफडकी २१,२२ व २३ फेबुवारीच्या तारखा जाहिर करुन टाकल्या.या तारखांवर राजकीय वर्तुळात एकाच पक्षातील दोन नेत्यामध्ये सुरु असलेली नुराकुस्ती असे नाव देण्यात आले.झालेही तसेच गोरेगाव येथील जनता दरबारात महसुल विभागावरच जनता वरचढ झाल्याने यापुर्वी झालेल्या समाधान शिबिराचाही लाभ जनतेला मिळाला नव्हता हा त्या जनता दरबारातून स्पष्ट झाले.असेही समाधान शिबिरात रेशन कार्ड हे नियमित वाटप करण्याचे कार्य आहे ती कामे केली गेली.वनहक्काचा अजून काही थांगपत्ताच नव्हता.त्यातच या शिबिराचा समारोपीय कार्यक्रम मुख्यमंत्र्याच्या नकारानंतर स्वतःच पालकमत्र्यांनी आपल्या मतदारसंघातील अर्जुनी मोरगाव येथे मंगळवारला आयोजित केला.त्या समाधान शिबिराच्या मंचावर भाजपच्या नेत्यांनीच पुर्ण कब्जा केला.कुठलेही पंचायतराज व्यवस्थित पदाधिकारी नाहीत असेही तिथे होते.मात्र पंचायत राज व्यवस्थेत जनतेने ज्यांना निवडून दिले अशा काँग्रेस,राष्ट्रवादीच्या जि.प.,प.स. व नगरपंचायतीच्या सदस्य व पदाधिकाèयांना डावलण्यात आल्याचे चित्र बघावयास मिळाले.काँग्रेसचे जि.प.सदस्य गिरिश पालीवाल हे जनतेमध्ये बसून राहिले परंतु प्रशासनाच्या एकाही अधिकायालाच नव्हे तर मंचावर बसलेल्या भाजपच्या नेत्यांना सुध्दा ते दिसले नसावे अशी परिस्थिती होती.समाधान शिबिर नाव असले तरी अनेक नागरिक तक्रारी घेऊन मंचावर मंत्र्याकडे पोचले मात्र मंत्री महोदयांनी त्यांचे समाधान न करताच मंचावरुन खाली पाठवले.शिबिरातील भाषणबाजीला कंटाळलेल्या जनतेने भाषण एैकण्याएैवजी परत निघण्यास सुरवात केल्याने कार्यक्रमातच खुच्र्या रिकाम्या दिसू लागल्याने मात्र आयोजकांची ताराबंळ उडाल्याचे दिसून आले