हलधर विकास केड्रिट को ऑफ.सोसायटीचे उदघाटन

0
10

गोंदिया,दि.४(berartimes.com)-महाराष्ट्रातील खान्देशसह गुजरात,दादरा नगरहवेली,मध्यप्रदेश,हरियाणा आदी राज्यातील नागरिकांचा विश्वास qजकल्यानंतर पुर्व विदर्भातील गोंदिया येथे प्रसिध्द द हलधर विकास केड्रिट को ऑपरेटिव्हने नव्या शाखेचा शुभारंभ आज रामनवमीच्या पर्वावर केला आहे.या शाखेचा शुभारंभ हलधर विकास केड्रिट को ऑफ सोसायटीचे जनरल मॅनजेर धिरजकुमार पाटील यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.नागरिकांना रिझव्र्ह बँकेने ठरवून दिलेल्या नियमानुसार सर्व सुविधा सोसायटीमार्फेत राबविण्यात येणार असून गृहकर्ज,उद्योगकर्ज,डिफाजिट ठेवी,आरडीच्या माध्यमातून पैसा ठेवता येणार आहे.आरबीआयने ठरवून दिलेल्या नियमानुसार कमीत कमी दरात कर्ज नागरिकांना हलधर विकास केड्रिट को ऑफ सोसायटी उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती जनरल मॅनेजर धिरजकुमार पाटील यांनी उपस्थित सोसायटीचे एजंट,लाभार्थी,कर्मचाèयांना दिली.यावेळी नव्या शाखेच्या संगणक कक्षाचेही उदघाटन शाखा व्यवस्थापक कु.संध्या बिसेन यांच्याहस्ते करण्यात आले.यावेळी डेव्हलपमेंट ऑफिसर अमित नागफासे,ज्यु.डेव्हलपमेंट ऑफिसर बाबुराव भेलावे,पब्लीक रिलेशन ऑफिसर घनश्याम आंबेडारे,शाखा व्यवस्थापक संध्या बिसेन,गणेशप्रसाद दमाहे,बाबुराव लिल्हारे,सुनिल वनवे व राजेश लिल्हारे आदी शाखेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.