पुणे, अहमदनगर व बडनेरा रेल्वेस्थानक स्वच्छतेत आघाडीवर

0
29

*पुणे,अहमदनगर आणि बडनेरा रेल्वे स्थानके स्वच्छतेत आघाडीवर*

*राज्यातील एकूण 38 रेल्वे स्थानकांचा समावेश*

*नवी दिल्ली* दि.१८: देशातील स्वच्छ रेल्वे स्थानकांची यादी आज रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी जाहीर केली. यादीत अ 1 श्रेणीत महाराष्ट्रातील पुणे रेल्वे स्थानकाने 9 वे स्थान पटकावत पहील्या दहात स्थान मिळवले. तर, अ श्रेणी मध्ये अहमदनगर ने तिस-या व बडनेरा रेल्वे स्थानक सहाव्या स्थानावर आहे.
रेल्वे भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत आज रेल्वे मंत्री सुरेश प्रभु यांनी देशातील स्वच्छ रेल्वे स्थानकांचा समावेश असलेल्या ‘स्वच्छ रेल स्वच्छ भारत’ योजनेअंतर्गत रेल्वे स्थानकांची नावे जाहीर केली. यावेळी रेल्वे राज्यमंत्री राजेन गोहन आणि रेल्वे बोर्डाचे ए.के.मित्तल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यादीत अ 1 श्रेणीत महाराष्ट्रातील 10 रेल्वे स्थानकांचा तर, अ श्रेणी मध्ये 28 अशा एकूण 38 रेल्वे स्थानकांचा समावेश आहे .
रेल्वे मंत्र्यांनी पुणे, बडनेरा व लोणावळा रेल्वे स्थानकांचे केले कौतुक
यावेळी बोलताना रेल्वे मंत्री सुरेश प्रभु यांनी देशातील रेल्वे स्थानकांवर स्वच्छतेबाबत होत असलेल्या सुधारणांबाबत समाधान व्यक्त केले. त्यांनी यावेळी पुणे व लोणावळा रेल्वे स्थानकांचा विशेष उल्लेख करत या रेल्वे स्थानकांनी मागील वर्षी पेक्षा स्वच्छता यादीत केलेल्या सुधारणेबाबत कौतुक केले. ते, म्हणाले, गेल्यावर्षी 75 व्या स्थानावर असलेल्या पुणे रेल्वे स्थानकाने आपल्या कामात महत्वपूर्ण सुधारणा करीत पहील्या 10 स्वच्छ रेल्वे स्थानकांच्या यादीत स्थान मिळवले आहे. या रेल्वे स्थानकावर समाजातील विविध घटकांच्या मदतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आल्याने हा बदल झाल्याचा उल्लेखही त्यांनी केला. बडनेरा रेल्वे स्थानकाने गत वर्षीच्या 269 व्या स्थानाहून थेट 6 व्या स्थानावर झेप घेतली आहे. लोणावळा रेल्वे स्थानकानेही 312 व्या स्थानाहून थेट 29 वे स्थान मिळविले असल्याचे त्यांनी सांगितले.
असे झाले परिक्षण
गेल्या वर्षीपासून रेल्वे मंत्रालयाच्यावतीने स्वच्छ रेल स्वच्छ भारत’ योजनेअंतर्गत देशभरातील रेल्वे स्थानकांचे विविध मानकांवर नामांकित संस्थेच्यावतीने परिक्षण करण्यात येते. यावर्षीही देशातील रेल्वे स्थानकांचे दोन श्रेणींमध्ये परिक्षण करण्यात आले. ज्या रेल्वे स्थानकांहून वर्षाकाठी 50 कोटींपेक्षा ज्यास्त प्रवाशी प्रवास करतात अशा रेल्वे स्थानकांना अ 1 श्रेणी मध्ये तर 6 ते 60 कोटीं प्रवाशी प्रवास करणा-या रेल्वे स्थानकांना अ श्रेणी मध्ये ठेवण्यात आले. रेल्वे स्थानका शेजारील खुल्या परिसरात स्वच्छता गृह, मुख्य प्रवेश द्वारा शेजारी स्वच्छतागृह व अन्य स्वच्छता. तसेच रेल्वे स्थानकावर खुल्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था, विक्रेत्यांची व्यवस्था, स्वच्छतागृहांची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय, प्रतिक्षालय, रेल्वे रूळ आणि पादचारी बाबींचे नीट निरीक्षण करून या रेल्वे स्थानकांना मानांकन देण्यात आले आहे. या सर्वांसाठी 1000 गुण ठरविण्यात आले होते पैकी विविध मानकानुसार गुणांकन करण्यात आले.
मुंबई उपनगरीय रेल्वेच्या 7 स्थानकांचा यादीत समावेश
स्वच्छ रेल्वे स्थानकांच्या यादीत मुंबई उपनगरीय रेल्वेच्या 7 रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. यात वांद्रे, मुंबई सेंट्रल, मुंबई सीएसटी, कल्याण जंक्शन, ठाणे, दादर आणि पनवेल या रेल्वे स्थानकांचा समावेश आहे.
महाराष्ट्रातील स्वच्छ रेल्वे स्थानके

*अ 1 श्रेणी स्थानके*

अ.क्र. विभाग रेल्वे स्थानक श्रेणी
1 मध्य रेल्वे पुणे जंक्शन 9
2 पश्चिम रेल्वे बांद्रा 15
3 मध्य रेल्वे सोलापूर 21
4 पश्चिम रेल्वे मंबई सेंट्रल 27
5 मध्य रेल्वे मुंबई सी.एस.टी 44
6 मध्य रेल्वे नागपूर 54
7 मध्य रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस् 60
8 मध्य रेल्वे कल्याण जंक्शन 63
9 मध्य रेल्वे ठाणे 68
10 मध्य रेल्वे दादर 70

*अ श्रेणी स्थानके*

अ.क्र. विभाग रेल्वे स्थानक श्रेणी
1 मध्य रेल्वे अहमदनगर 3
2 मध्य रेल्वे बडनेरा 6
3 मध्य रेल्वे अमरावती 11
4 मध्य रेल्वे बल्लारशाह 18
5 मध्य रेल्वे चंद्रपूर 20
6 मध्य रेल्वे वर्धा 21
7 मध्य रेल्वे भुसावळ 24
8 मध्य रेल्वे लोणावळा 29
9 मध्य रेल्वे दौंड 42
10 मध्य रेल्वे अकोला 45
11 मध्य रेल्वे शिर्डी 51
12. मध्य रेल्वे लातूर 53
13 मध्य रेल्वे कोपरगांव 54
14 पश्चिम रेल्वे अंकलेश्वर 63
15 दक्षिण मध्य रेल्वे परभणी जंक्शन 83
16. दक्षिण पूर्व मध्य गोंदिया 84
17 मध्य रेल्वे कोल्हापूर 101
18 मध्य रेल्वे मिरज जंक्शन 104
19 मध्य रेल्वे पनवेल 111
20 मध्य रेल्वे जलगांव 115
21 दक्षिण मध्य रेल्वे नांदेड 116
22 मध्य रेल्वे नाशिक रोड 123
23 दक्षिण मध्य रेल्वे औरंगाबाद 131
24 दक्षिण मध्य रेल्वे जालना 137
25 मध्य रेल्वे मनमाड जंक्शन 175
26 मध्य रेल्वे चाळीसगांव 186
27 मध्य रेल्वे शेगांव 193
28 उत्तर पश्चिम रेल्वे नागपूर 270