बसने चार रिक्षा, दुचाकी आणि कारला ठोकले, एक जागीच ठार

0
29

औरंगाबाद,दि. १६ :- प्रवाशी घेऊन  बीडला निघालेल्या एस.टी. बसचे अचानक ब्रेक फेल झाल्याने वेगातील बसने चार रिक्षा, एक दुचाकी आणि कारला ठोकरले. यावेळी बसने चिरडल्याने एक जण ठार झाला तर दोन गंभीर जखमी झाला. ही भीषण दुर्घटना  सायंकाळी ४.२० वाजेच्या सुमारास सिडको बसस्थानकाकडून वसंतराव नाईक चौकाकडे जाताना कॉर्नरवर घडली.या घटनेत मरण पावलेल्या आणि जखमींची व्यक्तीची ओळख पटलेली नाही. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांकडून  अपघाताविषयी मिळालेली अधिक माहिती अशी की, सोमवारी सायंकाळी ४.२० वाजेच्या सुमारास विना वाहक एस.टी. बस क्रमांक (एमएच-४०एन ९७६८)सिडको बसस्थानकातून  प्रवाशी घेऊन बीडला निघाली. बसस्थानकातून जळगाव रोडने वसंतराव  नाईक चौकाच्या दिशेने बस पुढे निघाताच बसचे ब्रेक निकामी झाल्याचे चालकाच्या लक्षात आले.मात्र वेगातील बसने समोर असलेल्या दुचाकीस्वाराला उडवले, यानंतर एकापाठोपाठ चार रिक्षा आणि ड्रायव्हींग स्कुलच्या कारला ठोकरले. यावेळी दोन रिक्षा सिनेमास्टाईल उडून बाजुला पडल्या तर एका रिक्षाला सुमारे १० फुट फरपटत नेल्याने रिक्षासह बस वाहतूक सिग्नलच्या खांबाला अडकली आणि थांबली.या घटनेत एक जण ठार झाला तर अन्य दोन गंभीर जखमी झाले. यावेळी बसच्या चाकाखाली एक जण अडकून जागीच ठार झाला. त्याचा मेंदू बसखाली विखुरला आणि रक्ताचे थारोळे घटनास्थळी साचले. या अपघाताच्या आवाजाने चौकात कर्तव्यावर असलेले वाहतूक पोलीस आणि रिक्षास्टॅण्डवरील रिक्षाचालकासह नागरीक मदतीसाठी धावले. यावेळी बसमधून उतरून बसचालक घटनास्थळावरून पसार झाला.