व्यापार वृद्धीसाठी दोन्हीदेश कटीबद्ध

0
8

नवी दिल्ली, दि. २६ – तीन दिवसाच्या भारत दौ-यावर आलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही देशांच्या उद्योजकांसाठी आयोजित केलेल्या चर्चासत्रात आपल्या भावना व्यक्त केल्या. विज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर करत दोन्ही देशांनी विकासाकडे वाटचाल करायला हवी असे ओबामा यांनी उद्योजकांना सांगितले. त्याचप्रमाणे भारतात शेती आणि इतर महत्वाच्या बाबींवर भर देणार असल्याचे मोदींनी आपल्या भाषणात सांगितले.
दोन्ही देशातील संबंध हे नैसर्गिक आहेत अमेरिकेतील उद्योजकांप्रमाणेच भारतीय उद्योजकही अमेरिकेत गुंतवणुक करण्यास उत्सुक असल्याचे ओबामा यावेळी म्हणाले. सन २०२५ पर्यंत ५०० अब्ज अमेरिकन डॉलरची उलाढाल व्यापारामधून होणार असल्याचेही ओबामा यांनी आपल्या भाषणात सांगितले आहे. तसेच दोन्ही देशांतील व्यापारांवर पंतप्रधान कार्यालयातून विशेष लक्ष ठेवणार असल्याचे मोदींनी उद्योजकांना सांगितले आहे. यावेळी अमेरिकेतील मोठ्या उद्योजक व कार्यकारी अधिका-यांपैकी (सीईओ) पेप्सी को. समुहाच्या इंद्रा नुई ,मास्टर कार्डचे प्रमुख अजय बागा, मॅग्राहील फायनान्सचे अध्यक्ष हॅरोल्ड मॅग्रा यांच्यासह इतर ३० मोठे उद्योजक उपस्थित होते. तसेच भारतील १७ मोठ्या उद्योजकांपैकी टाटा कंपनीचे सायरस मिस्त्री, हनीवेल कंपनीचे अध्यक्ष डेव्हीड एम. कोटे, आयसीआयसीआयच्या मुख्य अधिकारी चंदा कोचर, उद्योजक सुनिल मित्तल एस्सार ग्रुपचे प्रमुख शशी रुईया, महिंद्रा अँड महिंद्राचे प्रमुख आनंद महिंद्रा, ज्युबलियंट लाइफ सायन्सचे प्रमुख हरी भारतीय, इन्फोसिसचे कार्यकारी अध्यक्ष विशाल सिक्का इत्यादींसह अनेक मान्यवर उपस्थित होते