रायलसीमा एक्स्प्रेसचा डब्बा रेल्वे पटरीवरून घसरला ; जीवित हानी टळली

0
34

नादेंड,दि.23 रायलसीमा एक्सप्रेसचा डब्बा रेल्वे पटरीवरून खाली घसरल्याने कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नसुन काही गाड्या उशीरा धावणार तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकृत सूत्रांनी दिली.
गाडी संख्या १२७९३ तिरुपती हून निजामबाद कडे जाणारी रायलसिमा एक्स्प्रेस आपल्या नियोजित वेळात धावत होती. शनिवारी (ता.२३) सकाळी आठ वाजुन विस मिनिटांनी उप्पलवाई – सिरणापल्ली या रेल्वे मार्गावर रायलसीमा एक्स्प्रेस धावत असतांना अचानक रेल्वे पटरीवरून रेल्वे डब्याचे चाक खाली उतरल्याचे लक्षात येताच चालकाने  गाडी जागेवरच थांबविली. कोणत्याही प्रकारची जीवीत हानी झाली नसल्याचे सुत्राकडून सांगण्यात आले आहे. सकाळी दहाच्या सुमारास काचीगुडा ते मनमाड, त्या नंतर देवगीरी एक्स्प्रेसची वेळ होताच धर्माबादच्या रेल्वे स्थानकावर स्टेशन मास्तर मिना यांनी उप्पलवाई, सिरणापल्ली या मार्गावर रायलसीमा एक्सप्रेसचा डब्बा रेल्वे पटरीवरून खाली उतरला असुन काही लांब पल्ल्याचे गाड्या रद्द व काही गाड्या उशीरा धावतील असे सांगितल्याने असंख्य प्रवाशांची गैरसोय झाली. परभणी ,परळी वैजनाथ रेल्वे मार्गावरून काही गाड्या वळविण्यात आले. गाडी संख्या १७०५८ सिकंदराबाद हुन मुंबई कडे धावणारी देवगिरी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली. अंशता काही गाड्या रद्द करण्यात आले आहेत. गाडी संख्या ५७५९४ नांदेड मेडचल, गाडी संख्या ५७५९३ मेडचल नांदेड, गाडी संख्या ५७५०३ मिर्झापल्ली बोधन, गाडी संख्या ५७६०१ काचीगुडा निजामबाद धावणार्‍या गाड्या रद्द करण्यात आल्या. गाडी संख्या २०८०९ संबलपुर नांदेड ही गाडी विखाराबाद परळी वैजनाथ मार्गावरून वळविण्यात आली. गाडी संख्या १७०५७ मुंबई सिकंदराबाद ही गाडी परभणी परळी वैजनाथ मार्गावरून वळविण्यात आली असल्याची माहिती रेल्वे सुत्रांनी दिली.