बिलोलीत   पेन ,डायरी देऊन केला  पञकार दिन साजरा 

0
11
 नांदेड ( सय्यद  रियाज),दि.07ः अल ईम्रान प्रतिष्ठान बिलोली या संस्थेच्या वतीने ६ जानेवारी २०१८ रोज शनिवारी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिन साजरा करण्यात आला. अल ईम्रान प्रतिष्ठान च्या वतीने सभापती च्या निवासस्थानी मराठी वृत्तपत्राचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नगरसेवक तथा पत्रकार प्रकाश पोवाडे हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार राजेंद्र कांबळे, रत्नाकर जाधव, शिवराज रायलवाड, सुनील कदम, संजयकुमार पोवाडे आदि ची उपस्थिती होती.सुरवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तदनंतर सर्व पत्रकारांचा प्रतिष्ठान व माजी उपाध्यक्ष शंकर मावलगे यांच्या वतीने पेन,वही, पुष्पहार देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी पत्रकार प्रकाश पोवाडे यांना युवा पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.यावेळी पोवाडे यांनी अल ईम्रान प्रतिष्ठान ही संस्था सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतीक,कला, धार्मिक, तसेच महाराष्ट्रातील थोर महापुरुषांच्या जयंत्या व पुण्यतिथी आदि कार्यक्रम साजरा करून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. पुढे बोलताना पोवाडे म्हणाले की पत्रकारांनी आपले लिखाण समाजाच्या हितासाठी करावं असेही ते म्हणाले. यावेळी पत्रकार राजेंद्र कांबळे, रत्नाकर जाधव, शंकर मावलगे आदिनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन,प्रस्ताविक व आभार प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रा मोहसीन खान यांनी केले. कार्यक्रमास बिलोली शहरातील पत्रकार उपस्थित होते.