पेमेंद्र चव्हाण यांच्या राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने गौरव

0
12

गोंदिया,दि.07-महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक महासंघाच्यावतीने छत्रपती राजर्षी शाहू महाराज राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराचे वितरण नागपूर येथे आज रविवारला अजंठा सभागृह बैधनाथ येथे पार पडले.या कार्यक्रमात गोंदिया येथील ओबीसी सेवा संघ व ओबीसी संघर्ष कृती समितीचे सक्रिय पदाधिकारी असलेले शिक्षक पेमेंद्र चव्हाण यांचा गुणवंत पुरस्काराने सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक महासंघाचे दिनकर हनुवंते होते.उदघाटन आमदार ना.गो.गाणार यांच्या हस्ते पार पडले.कार्यक्रमाला एस.आर.कांबळे,बालाजीराव घोटवे,भाऊ दाबंदर,शिक्षणाधिकारी दिपेंद्र लोखंडे,डॉ.एम.एस.पटवे,राजाराम मोटघरे,मारोती खेडकर,महेंद्र भगत,गौरव टाकळीकर,रमेश पाटील,देवाजी भुजाडे पाटील,यशवंत डोंगरे,वंदना धाबेकर व स्वागताध्यक्ष चंद्रशेखर कापसे मंचावर उपस्थित होते.चव्हाण यांनी गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल ओबीसी संघर्ष कृती समिती व ओबीसी सेवा संघाच्यावतीने अभिनंदन करण्यात आले आहे.