वंजारी सेवा संघाची प्रदेश कार्यकारिणी जाहीर;प्रदेश प्रसिद्धीप्रमुखपदी नांदेडचे ज्ञानोबा नागरगोजे

0
26

नांदेड,दि.01ः-वंजारी सेवा संघाची प्रदेश कार्यकारिणी संघाचे संस्थापक अध्यक्ष राहुल जाधवर यांनी प्रदेशाध्यक्ष विठ्ठलराव गिते,युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष प्रकाश आव्हाड यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर केली असून राज्यातील वंजारी समाजातील  सक्रीय कार्यकर्त्यांना यामध्ये स्थान देण्यात आले आहे.त्यामध्ये वंजारी सेवा संघाच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी
डॉ नारायण जायभाय पुणे, मल्हारी खेडकर शिरूर,विजय ढाकणे जिंतूर तर प्रदेशउपाध्यक्षपदी अश्विनीकुमार सानप बुलढाणा,विष्णू भताने पाथर्डी,सोपान शेकडे बीड, धनंजय मुंडे बार्शी, प्रदेश सरचिटणीसपदी (संघटन) – दत्तात्रय जाधवर बार्शी,भाऊसाहेब मिसाळ बीड, सुदाम घुगे बदलापूर,नितिन सांगळे पुणे,प्रदेश सरचिटणीस (कार्यालय) श्री शिवराज मुंडे लातूर , प्रदेश कोषाध्यक्षपदी-  अभिजीत माळवे सातारा, प्रदेश चिटणीस-लक्ष्मण मिसाळ चंद्रपूर,अविनाश तांदळे जालना,डॉ रामेश्वर मुंडे अकोला,अनिल केंद्रे ,लातूर
प्रदेश संपर्क प्रमुख- प्रा.ज्ञानेश्वर मुंडे रिसोड,प्रा गुणवंत जाधवर उमरगा,प्रा बाजीराव काकड मुंबई, प्रदेश सहसंपर्क प्रमुख-विनोद सांगळे अमरावती,शिवराज मुंडे गंगाखेड, दत्ताजी सांगळे लातूर,संघटक- नितिन मुर्तडक नाशिक,अशोक घोळवे उस्मानाबाद,सुधाकर मुंडे कराड,प्रदेश सहसंघटक-निवास घुगे नवी मुंबई,प्रवक्ता प्राचार्य श्री दादासाहेब खेडकर ,भगवानगड /नाशिक, प्रसिद्धीप्रमुख -ज्ञानोबा नागरगोजे नांदेड,विधी सल्लागार ऍड शिवाजी जाधवर बार्शी,ऍड जयवंत आव्हाड मुंबई, आदींची निवड करण्यात आली आहे.आगामीकाळात वंजारी सेवा संघाच्या तालुका,जिल्हा, विभाग,व राज्यस्तरीय पदाधिकारी निवडी यथावकाश  जाहीर करण्यात येणार असल्याचे वंजारी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष राहुल जाधवर यानी सांगितले.यावेळी वंजारी सेवा संघाचे संस्थापक महासचिव बाजी दराडे, देवेंद्र बारगजे, अमोल कुटे, विष्णू जाधवर यांच्यासह वंजारी सेवा संघाच्या बहुसंख्य कार्यकर्त्याची उपस्थिती होती.