गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र उत्तम पर्याय- मुख्यमंत्री

0
7

मुंबई : राज्यातील उत्तम भौगोलिक व आर्थिक परिस्थिती, अद्ययावत तंत्रज्ञानाची उपलब्धता पाहता महाराष्ट्र गुंतवणूक करण्यासाठी उत्तम पर्याय आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

जर्मन संसद सदस्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृहात भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जर्मन संसदीय शिष्टमंडळाचे अध्यक्ष राल्फ ब्रिनखाऊस, जर्मन-भारतीय संसदीय मंडळाचे उपाध्यक्ष कॅथरीन वोग्लर, जर्मन संसदीय सदस्य जेन्स स्फान, डॉ. फ्रँक स्टेफल, डीर्क वाईस आदी उपस्थित होते.

राज्यामध्ये तांत्रिक कुशल मनुष्यबळ मोठ्या संख्येने उपलब्ध असून त्यांच्या कौशल्याचा उपयोग महाराष्ट्रात उद्योग उभारु इच्छिणाऱ्या उद्योगास होईल. त्याचप्रमाणे राज्यात दळणवळणाची साधने विपूल प्रमाणात उपलब्ध आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.