फलोत्पादन अभियानांतर्गत आँनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी मुदतवाढ द्या-भागवत देवसरकर यांची मागणी.

0
14
नांदेड,दि.20ःः-महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने NHM मार्फत विविध योजनांसाठी शेतकऱ्याकडून ऑनलाईन अर्ज मागवले जात आहेत.परंतु गेल्या दोन दिवसापासून सर्वर डाऊन असल्यामुळे शेतकऱ्यांना अर्ज करताना अडचणी येत आहेत अर्ज करण्याची मुदत उद्या संपत असल्यामुळे शेतकऱ्यांनाऑनलाईन अर्ज करण्यास मुदत वाढवून द्यावी अशी मागणी कृषी संचालक NHM पुणे यांच्या कडे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद सदस्य भागवत देवसरकर यांनी केली आहे.
NHM मार्फत शेडनेट, पॉली हाऊस, पॅक हाऊस,इतर योजनांसाठी राज्यातील शेतकऱ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागवले जात आहेत.यांची मुदत उद्या दि 20 जून पर्यंत आहे.परंतु गेल्या दोन दिवसापासून सर्वर डाऊन असल्यामुळे शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करताना अत्यंत अडचणी येत आहेत. जील्हातील फार कमी लोकांना अर्ज करता आले.NHM च्या विविध योजनांपासून जिल्यातील हजारो शेतकरी वंचित राहणार आहे.यामुळे कृषी विभागाच्या वतीने ऑनलाईन अर्ज दाखल करण्यास मुदत वाढवून द्यावी जेणेकरून वंचित शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज दाखल करता येईल अशी विनंती कृषी विभागाचे संचालक यांच्या कडे भागवत देवसरकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.