प्रधानमंत्री पीक विमा योजनेस मुदत वाढ द्या-भागवत देवसरकर यांची मागणी

0
32
नांदेड. दि.20 : -खरीप हंगाम 2018 साठीच्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांना आपल्या पिकाचा विमा काढण्यासाठी पीक विमा पोर्टल डाऊन असल्यामुळे अडचणी येत आहेत. पिक विमा योजनेचा लाभ वंचित लाखो शेतकऱ्यांना घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची तारीख 15 दिवसांनी वाढवून द्यावी असी आग्रही मागणी शासनाकडे निवेदनाद्वारे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष भागवत देवसरकर यांनी केली आहे.
नांदेड जिल्ह्यातील गेल्या अनेक दिवसापासून ऑनलाईन पीकविमा भरण्यासाठी पोर्टल डाऊन असल्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या पिकाचा विमा काढताना अत्यंत अडचणी येत आहेत.मागील काही दिवसांपासून सात बारा निघत नव्हत्या त्यामुळे ही सर्व्हर चालू असून सुद्धा पीक विमा भरता येत नव्हता.सध्या जिल्यातील लाखो  शेतकरी आपल्या पिकाचा विमा काढण्याचे राहिले आहेत.पहिले सात बारा आणी आता सर्व्हर डाऊन यामुळे शेतकरी CAC आणि सेतू सुविधा भोवती चकरा मारत आहेत.बिगर कर्जदार शेतकऱ्यांना 24 जुलै तर कर्जदार शेतकऱ्यांना 31 जुलै शेवटचं तारीख आहे. तारीख जवळ आल्यामुळे व पोर्टल डाऊन असल्यामुळे आपल्या पिकाचा विमा काढता येते की नाही याची काळजी शेतकऱ्यांना वाटत आहे. जिल्यातील मागील वर्षी 10 लाख 40 हजार शेतकऱ्यांनी आपल्या पीकाचा विमा काढला होता.यावर्षी आजपर्यंत फक्त 3 लाख 29 हजार शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा काढला आहे.मागील वर्षाच्या तुलनेत ही टक्केवारी 32 टक्के आहे.त्यामुळे जिल्ह्यातील लाखो शेतकरी पीक विमा भरण्यापासून वंचित राहतील,शासनाने या सर्व बाबी लक्षात घेऊन पीक विमा योजनेस 15 दिवसाची मुदत वाढवून द्यावी अशी मागणी भागवत देवसरकर यांनी केली आहे.
यावेळी उत्तर जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील आबादर,विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुनील पाटील, महानगर अध्यक्ष परमेश्वर काळे,अनिल देवसरकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.