सीमावर्ती भागातील प्रश्नासंदर्भात प्रशासनाने घेतला आढावा

0
21
बिलोली,दि.20ः- तालुक्यातील सीमावर्ती भागातील प्रश्नासंदर्भात विभागीय व जिल्हा पातळीवर बैठका होत असतानाच बिलोली तहसील प्रशासनाने आज (दि.20) बैठक घेऊन प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न केल्याने लवकरच सीमावर्ती भागातील नागरिकांच्या समस्यांचे निराकारण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
 बिलोली तालुक्यातील सीमावर्ती भागातील प्रश्नासंदर्भात गेल्या तीन महिन्यापासून बैठका आणि विकास योजनांच्या अंमलबजावणी संदर्भात कार्यक्रम सुरू आहे. विभागीय  आणि जिल्हा पातळीवर वेगवेगळ्या बैठका सुरू असतानाच बिलोली तहसील प्रशासनाने या विषयी स्वतंत्र बैठकीचे आयोजन आज 20 आक्टोंबरला केले होते. या बैठकीसाठी तालुका स्तरीय सर्व अधिकार्‍यांची बैठक घेऊन निराकरण करावयाच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या. याचबरोबर दरम्यानच्या कालखंडात कोणकोणती कामे पूर्णत्वाला गेली याविषयीची माहिती महसूल प्रशासन आणि प्रमुख समन्वयक यांनी सादर केली. बिलोली तालुक्यातील सर्व सीमावर्ती भागातील सरपंच, ग्रामसेवक  यांना पाचारण करण्यात आले होते. या बैठकीत प्रमुख समन्वयक गोविंद मुंडकर, गंगाधर प्रचंड, राजेंद्र पाटील कार्लेकर, राजू पाटील , व्यंकटराव सिद्धनोड,, श्रीयुत लोखंडे कार्ला खुर्द, सय्यद रियाज गंगाधर गट्टूवार यासह ग्रामस्थ श्रीयुत हानमंत गंज गावकर, नागनाथ गोजे, अभिजीत महाजन आणि ठिकठिकाणच्या सरपंचांनी आपले प्रश्न शिस्तीने आणि संयमाने प्रगट केले. या प्रश्नाच्या अनुषंगाने तहसीलदार श्रीयुत विक्रम राजपूत, वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता गोपुलवाड, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अशोक गरुडकर, पोलीस निरीक्षक भगवान धबडगे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे पवार, परिवहन विभागाचे चव्हाण, कृषी विभागाचे घुगे, वीज वितरण विभागाचे  बोधनकर, बिलोली नगरपरिषदेचे मुख्याधिकारी  ओमप्रकाश गोंड, नायब तहसीलदार संजय नागमवाड आदीं उपस्थित होते.