अमेरिकेतील मार्स या चॉकलेट कंपनीचे उत्पादन आता चाकणमधूनही होणार- सुभाष देसाई

0
15

महाराष्ट्र आणि अमेरिकेतील मार्स या चॉकलेट उत्पादन करणाऱ्या आंतरराष्ट्रीय कंपनीदरम्यान सामंजस्य करार करण्यात आला आहे. मार्स ही अमेरिकेतील चॉकलेट उत्पादन करणारी आंतरराष्ट्रीय कंपनी आहे. या कंपनीने पुणे येथील चाकण येथे उद्योग उभारण्याचे ठरविले असून यासाठी जवळजवळ 1005 कोटी रुपयांची गुंतवणूक पुढील काळात करण्यात येणार आहे. या प्रकल्पामध्ये सुमारे 1200 रोजगारांची निर्मिती होणार आहे, असे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे सांगितले.

यापूर्वी मार्स कंपनीकडून चॉकलेट्स आयात केली जायची ती आयात बंद होणार असून त्याचे उत्पादन महाराष्ट्रातच होणार आहे. पुणे येथील चाकण हा भाग चॉकलेट हब म्हणूनही ओळखला जाईल, असे सुभाष देसाई यांनी सांगितले.

माजी सदस्य सदाशिवराव मंडलिक व धोंडिराम वाघमारे यांना विधानसभेत आदरांजली

विधानसभेचे माजी सदस्य सदाशिवराव मंडलिक आणि धोंडिराम वाघमारे यांना शोक प्रस्तावाद्वारे आदरांजली वाहण्यात आली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतचा शोकप्रस्ताव मांडला. त्यावर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, सदस्य सर्वश्री गणपतराव देशमुख, डॉ.पतंगराव कदम, हसन मुश्रीफ, शंभुराज देसाई, प्रकाश आबिटकर, शशिकांत शिंदे, सुरेश हळवणकर यांनी शोक भावना व्यक्त केल्या.