खासदार अशोक चव्हाण यांच्या उमेदवारीवरील आक्षेप फेटाळले

0
28

नरेश तुप्तेवार/नांदेड,दि.28ः-काँग्रेस उमेदवारी अशोक चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज अखेर वैध ठरला आहे. जिल्हाधिका-यांनी याबाबत दाखल झालेले आक्षेप फेटाळल्याने काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे. काँग्रेसला मोठा दिलासा, अशोक चव्हाण यांच्या उमेदवारीवरील आक्षेप फेटाळले

नांदेड : काँग्रेस उमेदवारी अशोक चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज अखेर वैध ठरला आहे. जिल्हाधिका-यांनी याबाबत दाखल झालेले तिन्ही आक्षेप फेटाळल्याने काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे. विहित नमुन्यात निवडणूक अर्ज न भरणे, मालमत्तांची माहिती दडवणे तसेच प्रतिज्ञा पत्रात आर्थिक व्यवहाराची माहिती नमुद न करणे आदी आक्षेप दोन उमेदवारांनी घेतले होते.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अशोकराव चव्हाण हे उमेदवार होते. त्यावेळी त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर करताना आपली पत्नी, मुली यांना कोट्यवधींचे कर्ज दिल्याचे नमूद केले होते. तसेच काही मालमत्तांची माहितीही दिली होती, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मात्र अशोक चव्हाण यांनी आपल्या कुटुंबियांशी केलेल्या व्यवहाराची कोणतीही माहिती प्रतिज्ञा पत्रात दिली नसल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे. त्याचवेळी काही मालमत्तांबाबतची माहितीही त्यांनी दडविल्याचा आरोप करण्यात आला आहे. उज्वल गॅस एजन्सीच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या योजनांतील अनुदानाचा थेट लाभ चव्हाण हे घेत असल्याचेही आक्षेप घेण्यात आला आहे.अपक्ष उमेदवार रविंद्र थोरात आणि शेख अफजलोदिन अजिमोद्दीन उर्फ शेख सर(बहुजन महापार्टी)यांनी घेतलेल्या आक्षेपानवर बुधवारी प्रदीर्घ युक्तिवाद झाला. यानंतर जिल्हाधिकारी आणि मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी अरुण डोंगरे यांनी निकाल राखून ठेवला होता. जिल्हाधिकारी यांनी याबाबत रात्री उशिरा निर्णय दिला