ऑनलाइन नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांचा शेतमाल हमीभावाने खरेदी करा-देवसरकर

0
35
नांदेड,दि.29:-शेतकऱ्यांचा शेतमाल हरभरा तुर  नाफेड मार्फत हमीभावाने खरेदी करण्यासाठी  5 मार्च रोजी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी सुरू केली होती, नंतर ही नोंदणी 20 मार्चला बंद झाली,ऑनलाईन नोंदणीच्या कालावधीमध्ये अनेक शेतकऱ्यांना नोंदणी करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता,सातबारा वर पिकाची नोंद असावी ही अट घातल्यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकरी नोंदणीपासून वंचित राहिले ,त्यातच लोकसभा निवडणुकीचा काळ असल्यामुळे अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचित राहिले, खुल्या बाजारात तूर आणि हरभरा या मालाना अत्यंत कमी दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. नोंदणी न करू शकलेल्या सर्व शेतकऱ्यांची नाफेडमार्फत ऑफलाईन नोंदणी करून सर्व शेतकऱ्यांचा ,शेतमाल हमीभावाने खरेदी करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा ग्राहक संरक्षण समितीचे सदस्य भागवत देवसरकर यांनी प्रशासनाला दिला आहे.
जिल्ह्यामध्ये नाफेडमार्फत हरभरा तूर खरेदीसाठी खरेदी केंद्रे उघडली आहेत परंतु हजारो शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी न करता आल्यामुळे  अनेक खरेदी केंद्र माला अभावी ओस पडली आहे.उलट हमीभावापेक्षा अत्यंत कमी दराने खुल्या बाजारात हरभरा तुरीची विक्री होत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे जिल्ह्यात ऑनलाईन नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांचा माल आम्ही कसा खरेदी करणार असा प्रश्न नाफेडच्या अधिकारी शेतकऱ्यांना सांगू लागले, शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून तुरीला हमी भाव 5675 व हरभरा हमीभाव 4600 असतानाही शेतकऱ्यांना अत्यल्प दरात खुल्या बाजारात आपल्या मालाची विक्री करावी लागत आहेत, येत्या दोन दिवसात नाफेडमार्फत शेतकऱ्यांच्या शेतमालाची ऑफलाईन नोंदणी करून त्यांचा माल हमीभावाने खरेदी करावा अन्यथा प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही भागवत देवसरकर यांनी आपल्या निवेदनात दिला आहे.