औरंगाबाद आणि डून हाँग शहरांमध्ये ‘सिस्टर सिटी’करार

0
6

मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आनंद

मुंबई, दि. 15 :औरंगाबाद आणि डून हाँग या दोन शहरांमध्ये ‘सिस्टर सिटी’ करारावर आज स्वाक्षरी झालीयाचा आनंद होत आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी बीजिंगयेथे सांगितले.
मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, औरंगाबाद आणि डून हाँग या दोन शहरांमध्ये अनेक सांस्कृतिक समानता आहेत. चौथ्या शतकात बौद्ध भिख्खूंनी औरंगाबाद शहराशेजारील अजिंठा गुंफेत कोरलेल्या बुद्ध मूर्ती आणि डून हाँग येथील मोगाओ गुंफा यांच्यामध्ये बरेच साम्य आहे. राज्यीय पातळीवर अशाप्रकारचे सहकार्य वाढल्याने महाराष्ट्राला अधिक संधी तर मिळतीलच. त्याचबरोबर परस्पर संबंध अधिक वृद्धिंगत होतील.
दरम्यान शुक्रवारी सकाळी चीनमध्ये आयोजित राज्यस्तरीय नेत्यांच्या फोरममध्ये मुख्यमंत्र्यांनी मनोगत व्यक्त केले. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मुंबई आणि शांघाय ही दोन शहरे आर्थिक समृद्धीकडे वाटचाल करीत आहेत. त्यामुळे शांघायने मुंबईत गुंतवणूक करावी, अशी आमची इच्छा आहे. मुंबईतीलजलक्षेत्र विकास, हायस्पीड रेल्वे, मेट्रो, डॉकयार्डहे दोन्ही शहरांमध्ये समानता असलेले प्रकल्प असून विशेषत: या क्षेत्रात येणाऱ्या गुंतवणुकीचे आम्ही स्वागत करु.
मुख्यमंत्री म्हणाले,टीसीएस, पिरामल हेल्थ केअर, महिंद्रा अँड महिंद्रा, भारत फोर्ज आदी महाराष्ट्रीयन कंपन्यांनी औषधनिर्माण, आयटी, अभियांत्रिकी क्षेत्रात चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे.तसेच बैकी फोटॉन, सॅनी हेवी इंडस्ट्रीज, हेअर, हवाई या चिनी कंपन्यांची महाराष्ट्रात गुंतवणूक आहे. चिनी बँक ‘आयसीबीसी’देखील आपली सेवा महाराष्ट्रात देण्याच्या दृष्टीने आमच्या सरकारशी चर्चा करत आहे. राज्यात गुंतवणूक करुन चीनमहाराष्ट्राच्या विकासास सहाय्यभूत ठरु शकतो. भविष्यात महाराष्ट्रामध्येजास्तीत जास्त चिनी गुंतवणूक होईल, अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
चीन आणि भारत हे जगाच्या पाठीवरचे दोन जुने देश आहेत. या दोन्ही सभ्यतांचे नातेही तितकेच प्राचीन आहे. जुन्या काळात जागतिक अर्थव्यवस्थेत या दोन देशांचाच वाटा जवळजवळ 50 टक्के इतका होता. महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यातील डॉ. द्वारकानाथ कोटनिस चीनमध्ये आले आणि त्यांनी सन 1938 ते 1942 पर्यंत येथील जनतेची नि:स्वार्थ सेवा केली. चीनचे नेते माओ त्झे तुंग यांनी त्यांचे स्वागत करुन त्यांच्या पथकात सेवाकार्यही केले. चीनच्या जनतेने हेबेई प्रांतात डॉ. कोटनिस यांचे स्मारक उभारून त्यांचे आभार मानले.
भारत आणि चीन या दोन देशांची लोकसंख्या जगाच्या 36 टक्के लोकसंख्येएवढी आहे. म्हणजेच आज जगातील प्रत्येक तिसरी व्यक्ती ही चीनीकिंवा भारतीय आहे. म्हणूनच दोन्ही देशांमधील नाते दृढ करण्याच्या दृष्टीने राज्या-राज्यांमध्ये संबंध प्रस्थापित करणे संयुक्तिक आहे.भारत हा राज्यांमध्ये राहतो,असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास आहे. सहकार्यातून प्रादेशिक विकास आणि सर्वांचा विकास यावर त्यांचाभर आहे. म्हणूनच आर्थिक, सांस्कृतिक आणि मानवी संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने प्रादेशिक नेत्यांना हे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल श्री. मोदी यांच्याबरोबरच चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांचे आभार मानतो, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
आज भारतातही वेगाने विकास होतो आहे. पंतप्रधान श्री. मोदी यांनी स्मार्ट सिटीजचे स्वप्न साकारण्याच्या दृष्टीने घेतलेला पुढाकार मोठा आहे. महाराष्ट्र या क्षेत्रात भरीव योगदान देऊ शकतो. त्यामुळेच या क्षेत्रात चीनची तज्ज्ञता आणि गुंतवणूक आम्ही आमंत्रित करत आहोत, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
रामायणाचा चिनी भाषेत अनुवाद करणाऱ्या प्रो. जी झियानलिन यांच्या स्मृत्यर्थ चिनी भाषा/सांस्कृतिक केंद्र उभारण्याचा मानस आहे, असे सांगून श्री. फडणवीस म्हणाले, आज महाराष्ट्रातील गुंतवणूकदारांमध्ये चीनचे मोठेयोगदान आहे. चीन सध्या 350 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतकी गुंतवणूक करते आहे. बंदरांचा विकास आणि समुद्री प्रकल्पांच्या तंत्रज्ञानामध्ये चीनने उत्तम प्रगती केली आहे. मुंबईमध्येसागरी महामार्ग आणि ट्रान्सहार्बर लिंक बांधण्याचे आमचे नियोजन आहे. त्यामुळे किनारपट्टीच्या परिसरात चीनने केलेल्या पायाभूत विकासाची पाहणी करण्यासाठी क्विंगदाओ येथे लवकरच भेट देण्यात येईल.