मध्यप्रदेशात दोन एक्स्प्रेसचा भीषण अपघात, 31 ठार, 250 जखमी

0
10

वृत्तसंस्था
भोपाळ, दि. ५- मध्य प्रदेशच्या हारदामध्ये काल (मंगळवार) रात्री दोन एक्स्प्रेस गाड्यांचा भीषण अपघात झाला. इटारसी-मुंबई रेल्वे मार्गावर हारदा-खिरकियादरम्यान काली माचक नदीवरील पुलाखालील भराव वाहून गेल्याने मुंबई-वाराणसी कामायनी एक्सप्रेसचे 7 डबे रुळावरून घसरले. तसेच याच मार्गावर जनता एक्स्प्रेसचेही पाच डबे रूळावरून खाली उतरले आहेत. दोन्ही एक्स्प्रेसचे डबे नदीत कोसळल्याने अनेक प्रवासी बेपत्ता आहेत. यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. आतापर्यंत 31 प्रवाशांचा मृत्यु झाला असून 250 जखमी असल्याची माहिती मिळाली आहे
मुंबईहून वाराणसीला जाणारी कामयानी एक्सप्रेस रात्री साडे अकरा वाजता मध्यप्रदेशमधील खिरकिया या स्थानकावरुन रवाना झाली. २० मिनीटांनी या गाडीने हरदा येथे पोहोचणे अपेक्षीत होते. मात्र या दोन स्थानकादरम्यान माचक नदी असून या नदीवरील पुलावरुन जात असताना कामयानी एक्सप्रेसचे ११ डबे रुळावरुन घसरले. या अपघाताच्या अवघ्या काही क्षणांनंतर याच पुलावर बिहारमधील राजेंद्रनगरहून मुंबईकडे येणारी जनता एक्सप्रेसही आली व या गाडीचेही पाच डबे रुळावरुन घसरले. या भीषण अपघातात २४ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर १०० प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

घटनास्थळी बचावकार्य आता जवळपास संपुष्टात आले असून लवकरच या मार्गावरील सेवा पूर्ववत होईल असे त्यांनी सांगितले. मुसळधार पावसामुळे माचक नदीचे पाणी पुलावर आले होते व यामुळे रुळाखालील खडी वाहून गेली होती. यामुळेच डबे घसरुन हा विचित्र अपघात घडला असा अशी शक्यता वर्तवली जात आहे. रेल्वे मंत्रालयाने या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. अपघातातील मृतांना रेल्वेतर्फे दोन लाख रुपयांची तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. अपघातामुळे या मार्गावरील सुमारे ३५ गाड्यांच्या वाहतुकीला फटका बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे.