2022 पर्यंत संकल्‍प पूर्ण करा- पंतप्रधान मोदी

0
7

नवी दिल्ली दि. १५:- देश आज (शनिवार) 69 वा स्‍वातंत्र दिन साजरा करत आहे. पंतप्रधान नेरेंद्र मोदी यांनी लाल किल्‍ल्‍यावर दुसऱ्यांना राष्‍ट्रध्‍वज फडकला. ते म्‍हणाले, ”वर्ष 2022 पर्यंत आपल्‍याला सक्षम, समृद्ध, स्‍वस्‍थ, स्‍वाभिमानी भारत बनवायाचा आहे. प्रत्‍येकाला घर मिळावे, रोजगार मिळावा, देशातील तळागाळापर्यंत 24 तास वीज पोहोचावी, याचे स्‍वप्‍न केंद्र शासन पाहाले आहे. ते पूर्ण होण्‍याच्‍या दृष्‍टीने कृतीशील उपाय योजना केल्‍या जात आहेत. पण, त्‍यासाठी देशातील 125 कोटी नागरिक आणि सहा लाख गावांनीही असेच स्‍वप्‍न पाहावे आणि संकल्‍प करावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित करताना केले.
यावेळी देशवासियांना संबोधित करताना नरेंद्र मोदी यांनी देशात जातीयवादाला थारा नसून देश विकासाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे म्हटले आहे. “जर भारताची एकता भंग पावली तर भारतीयांचे स्वप्नही भंग पावू शकते. त्यामुळे देशात कोणत्याही प्रकारच्या जातीयवादाला थारा दिला जाणार नाही असेही मोदी यावेळी म्हणाले. भारताच्या “टीम इंडिया‘च्या सामर्थ्यावर भर देत मोदी म्हणाले की, “ही आपली टीम आहे ज्यांनी देश निर्माण केला तसेच जी देशाला नवी उंची प्राप्त करून देणार आहे‘

पंतप्रधानांनी आपल्या भाषणात मांडलेले मुद्दे-
संकटं झेलूनही भ्रष्टाचारमुक्त सरकारचं स्वप्न पूर्ण
काळा पैसा भारतात परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
सरकारच्या 15 महिन्याच्या काळात एक पैशाचाही भ्रष्टाचार नाही
सव्वाशे कोटी जनता म्हणजे भारत.
40 टक्के जनता बॅंक खात्यांपासून वंचित होती. आम्ही त्यांना बॅंकेशी जोडलं.
देशातील बॅंकांनी 17 कोटी जनतेला बॅंकेशी जोडून घेतलं मी बॅंकांचा अभिनंदन करतो.
विमा योजनेत सहभागी होऊन त्याचा लाभ घ्या.
स्वच्छता अभियानात लहान मुलांसह सर्वांनी सक्रिय सहभाग घेतला.
आम्ही गॅसची पाईपलाईन लावत आहोत. जेथे पिण्याचे पाणी घेण्यास कठीण परिस्थिती होती तिथे आम्ही गॅसचे पाईप लावणार आहोत.
देशाला आधी कंत्राटदार चालवत होते.
देशातील गरीबांनी 20 कोटीची रक्कम बॅंकांमध्ये जमा केली.
जगभरात भारताचं गुणगान गायलं जात आहे.
शेतकऱ्यांना खते देण्यासाठी आम्ही काम करत आहोत.
ऱ्विकासामध्ये दलित, पीडित, शोषितांना स्थान
शेतीच्या आर्थिक पैलूंवर तसेच शेती विकासावर आम्ही भर दिला.
कृषी मंत्रालयाचे जेवढे महत्व आहे तेवढेच महत्व शेतकऱ्याच्या कल्याणाला आहे.
शेतकऱ्यांच्या कल्याणाशिवाय कृषी विकास अपूर्ण.
भविष्यात शेतकऱ्यांसाठी विशेष योजना राबविणार.
देशातील 18,500 गावांत अद्यापही वीज पोहचू शकलेली नाही. त्यासाठी सरकार प्रयत्नशील.
जास्तीत जास्त रोजगार निर्माण करणाऱ्या समूहानां भारतातील गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन.
मुलाखतीसाठी पत्र आल्यानंतर देशातील तरुण शिफारशीच्या शोधत असतो. कारण गुणवत्तेपेक्षा शिफारशीला महत्व. त्यामुळे मुलाखतीशिवाय केवळ गुणपत्रिकेवरील गुणवत्तेनुसार नोकरी देण्याची गरज. त्यासाठी सरकार प्रयत्नशील.
काही अपवादात्मक पदांना वगळून छोट्या-मोठ्या नोकरीसाठी मुलाखती रद्द करणार.

कोणत्‍या पंतप्रधानांनी किती वेळा पडकावला लाल किल्‍ल्‍यावर झेंडा
जवाहरलाल नेहरू : 17 वेळा
इंदिरा गांधी : 16 वेळा
मनमोहन सिंह : 10 वेळा
अटल बिहारी वाजपेयी : 6 वेळा
राजीव गांधी : 5 वेळा
पी. व्‍ही. नरसिंह राव : 5 वेळा