जि.प.च्या विषय समित्या अविरोध

0
10

गोंदिया दि. १५: जिल्हा परिषदेच्या १0 विषय समित्यांच्या सदस्यांची निवड अविरोध झाली. गुरूवारी सायंकाळपर्यंत चाललेल्या या सभेत सर्व ८३ सदस्यांची अविरोध निवड करण्यात आली. ११ ऑगस्ट रोजी स्थगित झालेली सभा गुरुवारी (दि. १३) पुढे सुरू ठेवून ही निवड प्रक्रिया झाली.
जि.प. अध्यक्ष उषाताई मेंढे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे, सभापती पी.जी. कटरे, देवराम वडगाये, छाया दसरे, छाया नागपूरे, मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. यावेळी सर्व प्रमुख १0 समित्यांचे गठन करण्यात आले. त्यात स्थायी समिती, समाजकल्याण समिती, वित्त समिती, आरोग्य समिती, जल व्यवस्थापन समिती, पशुसंवर्धन समिती, बांधकाम समिती, कृषी समिती, महिला व बालकल्याण समिती व शिक्षण समितीचा समावेश आहे.
स्थायी समितीमध्ये एकुण ८ सदस्यांची निवड करण्यात आली. त्यात रमेश अंबुले, शोभेलाल कटरे, रजनी कुंभारे, राजलक्ष्मी तुरकर, गंगाधर परशुरामकर, उषा शहारे, सुरेश हर्षे, हमीद अल्ताफ अकबर अली यांचा समावेश आहे. बांधकाम समितीमध्ये दुर्गा तिराले, दीपक पवार, कैलास पटले, श्यामकला पाचे, सुखराम फुंडे, सविता रहांगडाले, कमलेश्‍वरी लिल्हारे, विठोबा लिल्हारे यांचा समावेश आहे. समाजकल्याण समितीमध्ये विजयकुमार टेकाम, भास्कर आत्राम, शीला चव्हाण, प्रीती रामटेके, जियालाल पंधरे, तेजकला शहारे, श्यामकला पाचे, शेखर पटले, कुमलेश्‍वरी लिल्हारे, सीमा मडावी, रोहिणी वरखडे यांचा समावेश आहे. कृषी समितीमध्ये भास्कर आत्राम, मंदा कुंभरे, सरिता कापगते, शीलाबाई चव्हाण, भोजराज चूलपार, विजय टेकाम, दीपक पवार, कैलास पटले, राजेश चुर्‍हे, सरिता रहांगडाले यांचा समावेश आहे.
अर्थ समितीमध्ये रमेश अंबुले, तेजकला शहारे, दिलीप चौधरी, ललीता चौरागडे, मनोज डोंगरे, विश्‍वजित डोंगरे, राजेश भक्तवर्ती, उषा शहारे यांचा समावेश आहे. महिला व बालकल्याण समितीमध्ये सरिता कापगते, ललिता चौरागडे, खुशबु टेंभरे, कमला पाऊलझगडे, माधुरी पातोडे, सुनीता मडावी, प्रीती वालदे, जियालाल पंधरे यांचा समावेश आहे. आरोग्य समितीमध्ये मंदा कुंभरे, राजेश चुर्‍हे, खुशबु टेंभरे, किशोर तरोणे, लता दोनोडे, शेखर पटले, विजय लोणारे, रोहिणी वरखडे यांचा समावेश आहे.
शिक्षण समितीमध्ये रजनी गौतम, लता दोनोडे, माधुरी पातोडे, गिरीश पालीवाल, राजेश भक्तवर्ती, सीमा मडावी, प्रीती रामटेके, अरविंद शिवणकर यांचा समावेश आहे. जलव्यवस्थापन समितीमध्ये माधुरी कुंभरे, वीणा बिसेन, शैलजा सोनवाने, कुंदन कटारे, विश्‍वजित डोंगरे, गिरीश पालीवाल यांचा समावेश आहे. पशुसंवर्धन समितीमध्ये माधुरी कुंभरे, मनोज डोंगरे, उषा किंदरले, कमला पाऊलझगडे, जियालाल पंधरे, विठोबा लिल्हारे, विजय लोणारे, शैलजा सोनवाने यांचा समावेश आहे.