राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पत्नीचे निधन

0
8

वी दिल्ली, दि. १८ – राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पत्नी शुभ्रा मुखर्जी यांचे आज निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेल्या शुभ्राज मुखर्जी यांनी आज सकाळी १० वाजून ५१ मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला.
शुभ्रा मुखर्जी यांच्यावर दोन आठवड्यांपासून दिल्लीच्या ए.आर.आर. रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने राष्ट्रपती मुखर्जी ओडिशा दौरा अर्धवट सोडून दिल्लीत परतले होते. मात्र अखेर आज शुभ्रा मुखर्जी यांचे निधन झाले.
शुभ्रा मुखर्जी यांचा जन्म बांग्लादेशाच्‍या नरैलमध्‍ये झाला. त्‍या दहा वर्षांच्‍या असताना त्‍यांचे कुटुंब कोलकत्‍त्‍यात आले आणि तेथेच स्‍थायिक झाले. 58 वर्षांपूर्वी 13 जुलै 1957 त्‍यांचे लग्‍न झाले.
त्‍यांना दोन मुलं आणि एक मुलगी आहे. त्‍यांचा मोठा मुलगा अभिजित हा बंगालमध्‍ये काँग्रेसचे खासदार आहे तर मुलगी कथक नृत्यांगना आहे. जेव्‍हा प्रवण मुखर्जी राष्‍ट्रपती झाले तेव्‍हा त्‍यांनी सांगितले होते, ”मला राजकारणापेक्षा बागकामात आवड आहे.” त्‍यामुळेच राष्‍ट्रपती भवनातील बागेची त्‍या स्‍वत: देखरेख करत होत्‍या.