कन्नड विचारवंत एम एम कलबुर्गी यांची हत्या

0
8

वृत्तसंस्था
धारवाड (कर्नाटक), दि. ३० – महाराष्ट्रात डॉ. नरेंद्र दाभोलकर व गोविंद पानसरे यांच्या हत्येचे गुढ उकलण्यात अपयश येत असतानाच कर्नाटकमध्ये कन्नड विचारवंत एम एम कलबुर्गी यांची रविवारी सकाळी अज्ञात व्यक्तींनी गोळी झाडून हत्या केली. साहित्य क्षेत्रातील अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले होते.

धारवाड येथे राहणारे ७७ वर्षीय एम एम कलबुर्गी रविवारी सकाळी घराबाहेर पडत असताना अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात कलबुर्गी यांचा मृत्यू झाला. हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कलबुर्गी हे हम्पी विद्यापीठाचे माजी कुलगुरु असून हिंदू धर्म व मूर्तीपुजेला विरोध केल्याने त्यांच्यावर टीका

महाराष्‍ट्रातील पुरोमागी विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्‍या ज्‍या पद्धतीने करण्‍यात आली. त्‍याच पद्धतीने तसाच हल्‍ला कलबुर्गी यांच्‍यावरही करण्‍यात आला. डॉ. कुलबर्गी हे धारवाड येथील कल्याणनगरमधील आपल्या घरी होते. दरम्‍यान, दुचाकीवरून आलेल्‍या दोन हल्‍लेखोरांपैकी एकाने त्‍यांचे दार ठोठावले. एक जण बाहेरच दुचाकी घेऊन उभा होता. कलबुर्गी यांनी दार उघडताच त्‍यांच्‍यावर दार ठोठावणाऱ्याने गोळ्या झाडल्‍या त्‍यातील एक गोळी त्‍यांच्‍या माथ्‍यावर लागली तर दुसरी छातीत. स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने जवळच्या रूग्णालयात नेले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. हल्‍लेखोर हे दुचाकीवरून आले होते.