भूसंपादन विधेयकावर आता अध्यादेश नाही; मोदींची मन की बात

0
10

नवी दिल्ली, दि. ३० – भूसंपादन विधेयकावरुन मोदी सरकारने माघार घेतली असून आता पुन्हा भूसंपादन विधेयकावर अध्यादेश काढणार नाही अशी महत्त्वपूर्ण घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बात कार्यक्रमात केली आहे. मात्र विधेयकातील १३ महत्त्वाच्या मुद्द्यांची आजपासून अंमलबजावणी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मन की बातमधून देशवासीयांशी संवाद साधला. यात त्यांनी भूसंपादन विधेयकावर माघार घेत असल्याचे सांगितले.
दरम्यान, इंदू मिलच्या जागेवर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारकही बांधले जाईल, असेही ते म्‍हणाले.मोदी म्‍हणाले, ”गेल्या काही दिवसांत गांधी आणि पटेल यांच्‍या गुजरातमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारामुळे संपूर्ण देशाला अस्वस्थ केले आहे. ही घटना दु:खत आहे .

मोदींच्‍या भाषणातील महत्‍त्‍वाचे मुद्दे
>लंडनमध्‍ये ज्‍या घरात बाबासाहेब राहिले ते घर महाराष्ट्र सरकार घेत आहे, त्‍यासाठी शुभेच्‍छा
> वैद्यानिक क्षेत्रात युवकांची आवड वाढत आहे. आपला देश या क्षेत्रात प्रगती करत आहेत.
>माता आणि बाल शिशू मृत्यू दर चिंतेचा विषय आहे. त्‍यावर नियंत्रण कसे आणावे, यासाठी 24 देशात विचार सुरू आहे. आपण पोलिओ मुक्‍त झालो आहेत आणि माता आणि नवजात मुलांना वाजवायचे आहे.
>डेंगूपासून वाचणे सोपे आहे. त्‍यासाठी प्रत्‍येकाने आपले घर आणि परिसरातील स्‍वच्‍छता करावी. सण, उत्‍सव आणि स्‍वच्‍छता यांची सांगड घालायला हवी.
>छोटी नोकरींसाठी घेत असलेल्‍या मुलाखती लवकरच बंद केल्‍या जतील.
> मागील काही दिवसांपूर्वी सूफी परंपरेच्‍या लोकांना भेटलो. इस्‍लामाची योग्‍य विचारधारा जगात पोहोचण्‍याची गरज आहे.