मोदींची प्रतिमा रुपयांपेक्षाही खाली गेली : सोनिया गांधी

0
6

वृत्तसंस्था
पटना (बिहार) दि. ३० –- ‘मोदी सरकारच्‍या काळात दिवसेंदिवस महागाई वाढतच आहे. जागातिक बाजारपेठेत जशी रुपयांच्‍या किमतीची घसरण होत आहे, त्‍यापेक्षाही अधिक घसरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या प्रतिमेचे होत आहे’, असे प्रतिपादन राष्‍ट्रीय काँग्रेस समितीच्‍या अध्‍यक्ष सोनिया गांधी यांनी केले. बिहारमध्‍ये होऊ घातलेल्‍या विधानसभा निवडणुकीच्‍या अनुषंगाने जेडीयू,आरजेडी, सपा आणि काँग्रेस या महायुतीच्‍या प्रसारसभेत आज (रविवार) त्‍या बोलत होत्‍या.
सोनिया पुढे म्‍हणाल्‍या, ” नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी 56 इंचाची छाती दाखवत खोटे आश्‍वासन दाखवले आणि मते मिळवलीत. निवडणुकीपूर्वी मोदी हे पाकिस्‍तानवर कडाडून टीका करत असत. पण, आज सीमेवर रोज हल्‍ले होत आहेत. आपले जवान शहीद होत आहेत. सामान्‍य नागरिकांना जीव गमवावा लागत आहे. त्‍यावर ते कृतीशील उपाय का करत नाहीत? पाकिस्‍तानकडून होत असलेल्‍या हल्‍ल्‍यावर त्‍यांच्‍याकडे काय उपाय आहे? देशाला हादरवून सोडणाऱ्या व्यापमं घोटाळ्याप्रकरणी त्‍यांनी मौनव्रत का धारण केले ?” असे प्रश्‍नही त्‍यांनी उपस्थित केलेत.