भारतीय बनावटीच्‍या क्रूज क्षेपणास्‍त्राची चाचणी अपयशी

0
4

भुवनेश्वर – जमीनवरून जमीनवर मारा करणारी भारतीय बनावटीच्‍या क्रूज क्षेपणास्‍त्राची चाचणी आज (शुक्रवार) अपयशी ठरली. हे क्षेपणास्‍त्र हवेतच दिशाहीन झाले असून, त्‍यात अनेक तांत्रिक अडचणी आल्‍यात.
लॉन्चिंगनंतर काय झाले?
डीआरडीओच्‍या सूत्रांनुसार, शक्रवारी सकाळी 11.38 वाजता ओडिशाच्‍या बालासोरमधील चांदीपूर इंटिग्रेटेड टेस्ट रेंजपासून निर्भय क्षेपणास्‍त्र लॉन्च केले गेले होते. पण, टेस्ट फायरच्‍या 11 मिनिटानंतर क्षेपणास्‍त्र निर्धारित ठिकाणापासून भटकले. त्‍याला 750 ते 1000 किलोमीटरची रेंज कवर करायची होती. परंतु, 128 128 किलोमीटर अंतर कापल्‍यानंतर ते बंगालच्‍या खाडीत पडले.