स्वच्छ भारत अभियानासाठी अर्धा टक्का कर

0
7
नवी दिल्ली, दि. ६ – स्वच्छ भारत अभियानासाठी दिवाळीनंतर १५ नोव्हेंबर पासून देशभरात सर्व सेवांवर अर्धा टक्का स्वच्छता सेस(कर) लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, त्यामुळे एकूण कर १४.५ टक्के होणार आहे. देशातील प्रत्येक नागरीकांकडून स्वच्छता करामध्ये जमा होणारी रक्कम स्वच्छ भारत अभियानासाठी वापरण्यात येणार आहे. १०० रुपयाच्या सेवावर ५० पैसे कर आकारण्यात येणार आहे.
चालू वर्षात आर्थिक बजटमध्ये याचा समावेश करण्यात आला आहे. याची अंमलबजावनी १५ नोव्हेंबरपासून करण्यात येणार आहे. यामधून जमा होणारा पैसा देशहितासाठी वापरण्यात येईल.
निती आयोगाच्या स्वच्छ भारत अभियानासाठी मुख्यमंत्र्याच्या उप समितीने स्वच्छता कर लावण्याची शिफारस केली होती, त्यानुसार देशभरात सर्व सेवांवर अर्धा टक्का स्वच्छता कर लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.