उत्पादन शुल्कात वाढ झाल्यामुळे पेट्रोल, डिझेलचे भाव वाढणार

0
11
नवी दिल्ली, दि. ७ – पेट्रोल व डिझेलवरील उत्पादन शुल्कात वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला आहे. पेट्रोलच्या उत्पादन शुल्कात प्रतिलीटरमागे १ रुपया ६० पैशांची तर डिझेलच्या उत्पादन शुल्कात प्रतिलीटरमागे ४० पैशांची वाढ झाल्याने पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.
मोदी सरकारच्या कार्यकाळात पेट्रोल-डिझेरवरील उत्पादन शुल्कात गेल्या वर्षभरातील ही पाचव्यांदा केलेली वाढ आहे.
याशिवाय १५ नोव्हेंबरपासून  स्वच्छ भारत या उपकराचीही अमलबजावणी होणार आहे. सेवाकराच्या १४ टक्के या दरावर हा अर्धा टक्क कर आकारला जाणार असल्याने सेवा कराअंतर्गत येणाऱ्या सर्वच घटकांच्या किमतीमध्ये वाढ होणार असून शॉपिंग, हॉटेलिंग, विमान प्रवास इत्यादींच्या किमतीत वाढ होईल.