महा.प्रदेश कलचुरी समाज अध्यक्षपदी दिपक जायस्वाल

0
15
राष्ट्रीय कलचुरी एकता महासंघाचे संमेलन
गोंदिया, दि.7 : गोंदिया राष्ट्रीय कलचुरी एकता महासंघाच्या वतीने येथील स्वागत लॉन येथे संमलनाचे आयोजन करण्यात आले होते. याचवेळी विवाहयोग्य युवक-युवतींचाही परिचय मेळावा घेण्यात आला.
कार्यक्रमला राष्ट्रीय संयोजिका अर्चना जायस्वाल, राष्ट्रीय अध्यक्ष हुकु‘मचंद जायस्वाल, राकेश राय, विपीन गुप्ता, शैलेंद्र महाजन, कल्पना राय, नरेंद्र धुवारे, दीपक जायस्वाल, आनंद भमोरे, योगेंद्र जायस्वाल, राकेश जायस्वाल, मीना मालवीय, रमेद्र जायस्वाल, निरज कटकवार, ललित जायस्वाल, मंगला जायस्वाल, रीता जायस्वाल, जागृती जायस्वाल, प्रदीप जायस्वाल, अजय जायस्वाल, राजेश मोहबे, अण्णाजी महाराज, डॉ. संतोष जायस्वाल उपस्थित होते. या अधिवेशनाता दिपक जायस्वाल यांची कलचुरी समाज महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदावर निवड करण्यात आली.
विवाहयोग्य युवक- युवती परिचय मेळाव्यात ४०० युवक- युवतींनी सहभाग घेतला. यावेळी कलचुरी मिलन पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. संचालन ललित जायस्वाल व रवींद्र मिसाळ यांनी केले. आभार निरज कटकवार यांनी मानले.