कणी व कोंडा परस्पर विकून राईस मिलर्सनी लावला एक लाख कोटीचा चुना

0
6

वृत्तसंस्था
नवी दिल्ली-गेल्या सरकारच्या काळात गाजलेल्या कोळसा खाण,टू जी घोटाळ्यासारखी गुंज आत्ता या सरकारच्या काळात राईस मिलर्स च्या नावाने समोर येणार आहे.कॅगने आपल्या दिलेल्या एका अहवालात देशातील सर्वच राईस मिलर्सनी मिळून आत्तापर्यंत एक लाख कोटीचा घोटाळा कणी व कोंड्याच्या माध्यमातून केल्याचे समोर आले आहे.हा घोटाळा कॅगने समोर आणल्याने संसदेच्या या अधिवेशनातही राईस मिलर्सचा हा घोटाळा गाजण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
खरीप व रब्बी हंगामातील धान शेतकèयांकंडून सरकार हमीभावाने खरेदी करते.त्यानंतर ते धान मिqलगसाठी राईस मिलर्संना देते.राईस मिलर्स त्या धानाची मिलींग करून तांदूळ शासनाच्या अन्नपुरवठा विभागाकडे जमा करीत आले आहेत.परंतु त्यांनी मिलींग करतांना तांदळासोबत निघालेल्या लहान कण्या ,कुक्कुस व कोंडा स्वतःकडे ठेवत परस्पर विक्री केले.हे सर्व सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे झाल्याने राईस मिल मालकांचे चांगलेच फावल्याचेही अहवालात कॅगने आपल्या अहवालात म्हटल्याचे कोब्रापोस्टने म्हटले आहे.देशभरातील राईस मिलर्स दरवर्षी कणी व कोंडा विकून १० हजार कोटी रुपये कमवीत असल्याचे म्हटले आहे.गेल्या १० वर्षाचा विचार केल्यास १ लाख कोटीचे सरकारच नुकसान झाल्याचे कोब्रापोस्टने म्हटले आहे.या राईस मिलर्स महाराष्ट्रातील गोंदिया,भंडारा,छत्तीसगड,पंजाब,उत्तरप्रदेशात मोठ्या संख्येने आहेत.