मोदींच्या हस्ते बॅटरीवर चालणाऱ्या बसचे उद्घाटन

0
8

वृत्तसंस्था

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बॅटरीवर चालणाऱ्या बसचे उद्घाटन करून बसची किल्ली लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्याकडे आज (सोमवार) दिली. जगभरात वाढत चाललेल्या प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त करताना मोदी म्हणाले, ‘जगभरातील नेते वाढत्या प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त करत आहेत. जगभरातील 122 देश असे आहेत की 300 दिवस सूर्य प्रकाश मिळत नाही. भारत, फ्रान्स व अमेरिकेने एकत्र येऊन काम करण्याचे ठरवले आहे. पॅरिसमध्ये झालेल्या संमेलदनादरम्यान काही महत्वपूर्ण निर्णय झाले आहेत.‘ 

लोकसभेच्या आवारात बॅटरीवर चालणाऱ्या दोन बसेस चालणार आहेत. या बसमुळे प्रदूषण होणार नाही. शिवाय, देखभाल खर्चही कमी आहे. मंत्र्यांनी या बसचा वापर करावा. मार्च 2016 पर्यंत अशा प्रकारच्या बसेस काही राज्यांना देण्यात येणार आहेत, असेही मोदी म्हणाले.