शिक्षक पात्रता परीक्षा २०१४ पात्र उमेदवारांनी २८ ते ३० पर्यंत प्रमाणपत्र घ्यावेत

0
9

गोंदिया,दि.२१ : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (चअकअढएढ) २०१४ ला पात्र ठरलेल्या परीक्षार्थींचे प्रमाणपत्र २८ ते ३० डिसेंबर पर्यंत शिक्षण विभाग(प्राथमिक) जिल्हा परिषद येथे देण्यात येत आहे. उमेदवारांनी प्रत्यक्ष हजर राहून कागदपत्रे व प्रमाणपत्रे यांच्या सत्यप्रत घेऊन महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रमाणपत्र घ्यावे. उमेदवारांनी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेशपत्राची मुळप्रत व सत्यप्रत किंवा परीक्षा शुल्क भरलेल्या चलनाची मुळप्रत व सत्यप्रत, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा गुणपत्रिकेची प्रत, डी.टी.एड. उत्तीर्ण गुणपत्रक किंवा प्रमाणपत्राची सत्यप्रत अथवा बी.एड.उत्तीर्ण गुणपत्रिकेची किंवा प्रमाणपत्राची सत्यप्रत अथवा दोन्ही परीक्षांच्या सत्यप्रत, आरक्षण प्रवर्गाचे प्रमाणपत्र सत्यप्रत, निवडणूक ओळखपत्र, बँक पासबुक, आधारकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आणि पॅन कार्ड इत्यादीपैकी एक ओळखपत्र सोबत आणावे. असे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद गोंदिया यांनी कळविले आहे.