सेन्सॉर बोर्डाच्या फेररचनेसाठीच्या समिती अध्यक्षपदी श्याम बेनेगल

0
6
नवी दिल्ली, दि,१ –  सेन्सॉर बोर्डाच्या फेररचनेसाठी ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या नेतृत्वाखाली सरकारने एक समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये किती जण असणार आहेत आणि कोण याचा खुलासा अद्याप झालेला नाही. पण केंद्र सरकारच्या या निर्णयाचे अभिनेता अनुपम खेर यांनी स्वागत केले आहे.
 ‘स्पेक्टर’मधील किसिंग सीनला भारताच्या सेन्सॉर बोर्डानं कात्री लावण्याचा प्रकार असो किंवा कस वर्ड्सवर म्हणजे अर्वाच्य भाषेवर बंदी असो, बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांचे अनेक निर्णय  वादग्रस्त ठरले. स्पेक्टर सिनेमाला यूए सर्टिफिकेट दिलं त्यानंतर सोशल मीडियावर या प्रकरणाविरोधात जोरदार चर्चा सुरु झाली