विनाअनुदानित एलपीजी ५० रुपयांनी महाग

0
12
नवी दिल्ली – विनाअनुदानीत घरगुती गॅस सिलिंडर ५० रुपयांनी महागल्याने नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी नागरिकांना महागाईचा तडाखा बसला आहे. गॅसच्या दरातील वाढीमुळे सर्वसामान्य नागरीकांचे मासिक बजेट बिघडले आहे.
आधीच केंद्र सरकारनं १० लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना सिलेंडरवर मिळणारी सबसिडी रद्द केली आहे. त्यामुळे या वाढीव दराचा भुर्दंड त्या सर्वांना सोसावा लागणार आहे.
काल पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करुन नववर्षाच्या पूर्वसंध्येला पेट्रोल कंपन्यांनी देशवासियांना खुशखबर दिली होती, पेट्रोल ६३ पैसे प्रति लिटर आणि डिझेल १.०६ पैशांनी स्वस्त करण्यात आले होते. मात्र  आज विनाअनुदानित सिलेंडरची किंमत वाढवल्याने नागरिकांना महागाईचा तडाखा बसलाच.