माझा मुलगा देशद्रोही नाही, हिंदुत्वविरोधी आहे

0
9

वृत्तसंस्था

नवी दिल्ली, दि. १४ – माझा मुलगा देश विरोधी नाही. फक्त तो हिंदुत्वाच्या राजकारणाला विरोध करतो म्हणून त्याला लक्ष्य केले जात आहे. त्याने काहीही चुकीचे केलेले नाही. त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्न येतोच कुठे ? अशी प्रतिक्रिया जवाहरलाल नेहरु विद्यापाठीतील देश विरोधी घोषणां प्रकरणी अटक करण्यात आलेल्या कन्हया कुमारचे पिता जयशंकर सिंह यांनी दिली. कन्हय्याचे कुटुंब बिहारच्या बेगूसराय जिल्ह्यातील मसलनपूर-बिहाट या गावी रहाते. छोटे शेतकरी असलेल्या जयशंकर सिंह यांना दोन वर्षांपूर्वी पक्षघाताचा झटका आला. तेव्हापासून ते बिछान्याला खिळून आहेत. मीणा देवी या अंगणवाडी सेविका असून, महिन्याला त्यांना चार हजार रुपये वेतन मिळते.
देशद्रोहाच्या आरोपाखाली कन्हय्या कुमारला शुक्रवारी अटक करण्यात आली. तो जेएनयूमधील विद्यार्थी संघटनेचा नेता आहे. माझ्या मुलाचा लहानपणापासून राजकारणाकडे ओढा आहे पण त्याने कधीही देश विरोधी वक्तव्य केलेले नाही असे कन्हय्याची आई मीणा देवी यांनी सांगितले.