गिरगाव चौपाटीवरच्या ‘मेक इन डंडिया’च्या सेटला आग

0
9
मुंबई, दि. १४ – गिरगाव चौपाटीवर सुरु असलेल्य मेक इन इंडियाच्या कार्यक्रमात भीषण आग लागली आहे. ‘मेक इन महाराष्ट्र’ अंतर्गत गिरगाव चौपाटीवर सुरु असलेल्या महाराष्ट्र रजनीच्या सेटवर ही भीषण आग लागली आहे. या आगीत सेट पुर्णपणे जळून खाक झाल्याचे चित्र आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, पण ही आग शॉर्ट सर्किटने लागल्याचा अंदाज आहे.
आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाच्या १६ गाड्या आणि पाण्याचे ६ टँकर घटणास्थळी पोहचले आहेत. अग्निशामक दलाचे कर्मचारी आग विझवण्या प्रयत्न करत आहेत. सुदैवाने या आगीत कोणतीही जिवीत हाणी झाल्याचे वृत्त नाही.अभिनेत्री पूजा सावंत सेटवर लावणी सादर करत असतानाच मंचाच्या खालील बाजूने आग लागली. त्यानंतर संपूर्ण सेटवर आगीने अक्राळविक्राळ रुप धारण केलं. प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी हा सेट डिझाईन केला होता. काहीच वेळापूर्वी अमिताभ बच्चन यांचा कार्यक्रम सादर झाला होता. आमीर खान, हेमा मालिनी, विवेक ओबेरॉय, श्रेयस तळपदे, इशा कोपीतकर, यासारखे अनेक लहानमोठे कलाकार उपस्थित होते.