लोकसभेचे माजी अध्यक्ष पी.ए. संगमा यांचे निधन, कामकाज तहकूब

0
8

नवी दिल्ली- लोकसभेचे माजी अध्यक्ष पी.ए.संगमा यांचे आज (शुक्रवारी) सकाळी निधन झाले. ते 68 वर्षांचे होते. दिल्लीतील त्यांच्या राहत्या घरी त्यांना ह्रदयविकाराच्या झटका आला. त्यातच त्याची प्राणज्योत मालवली. पी.ए.संगमा 11 व्या लोकसभेचे अध्यक्ष होते.

संगमा यांच्या निधनाची माहिती लोकसभेत अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी दिली. सभागृहात संगमा यांना आदरांजली वाहिण्यात आली. त्यानंतर लोकसभेचे कामकाज मंगळवारपर्यंत तहकूब केल्याची सुमित्रा महाजन यांनी घोषणा केली.

‘पी.ए. संगमा यांचा लोकसभा अध्यक्षपदाचा कार्यकाळ विसरण्यासारखा नाही.’, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ट्विटर’च्या माध्यमातून संगमा यांना आदरांजली वाहिली आहे.